डॉक्टर अनिल साळुंके ,
सर चिटणीस,भारतीय भटके विमुक्त युथ फ्रंट.
साई क्लिनिक,हलावपूल,तुलसी भवन,हॉल रोड,कुर्ला,मुंबई.४०००७०.

"समान संधी साठी विशेष संधी"
१७/३/२०१३

सेटलमेंट मध्ये कोणत्या-कोणत्या जमतींना ठेवण्यात आले होते,ज्या गुन्हेगार जमाती होत्या त्यांना ठेवण्यात आले होते.अश्या जमाती कोणत्या होत्या तर टकारी,लामान,बंजारा,राजपूत भामटा,कैकाडी इत्यादी १४ जमतींना ठेवण्यात आले.यांनाच का तर या जमाती ब्रिटिशांना जास्त त्रासदायक,लढनारया आणि उपद्रवी वाटत होत्या.अश्या जमातींना गुन्हेगार जमाती ठरवून,क्रिमिनल ट्राइब संबोधले.१८७१ सालचा गुन्हेगार कायदा बनवला.सगळ्यांना कुटुंबासहित सदर जाती-जमतींना तारेच्या काटेरी बंदिस्त कुंपणात बंद करण्यात आले व समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वेगळे करण्यात आले.
नामसाधर्म्य असणार्या जमातींना बंदिस्त बंदिस्त केले नाही.का तर ब्रिटिशांना तत्सम जाती गुन्हेगार वाटत नव्हत्या,उपद्रवी वाटत नव्हत्या.त्या जाती नागरी जीवन उत्तमप्रकारे,सन्मानाने जगत होत्या.असा वर्ग मोठा होता.आणि गुन्हेगार जमातींशी आमचा काही संबंध नाही.असे दर्शवून ब्रिटिशांची सहानुभूती प्राप्त करत होता.आज हाच वर्ग नामासाधर्म्याचा उपयोग करून आरक्षित भटक्या-विमुक्त जातींच्या सवलती अवैधरित्या मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे.पैशाच्या व लोकप्रतिनिधी यांच्या बळावर मूळ भटक्या-विमुक्त जातींच्या सवलती लाटण्याचा प्रयत्न करीत आहे.
आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी नामसाधर्म्य आणि जातिसापेक्षता असणार्या वर्गांना खोट्या पद्धतीने सवलती मिळवण्याची गरज का निर्माण झाली याचे उत्तर पुढील प्रमाणे आहे.स्वातंत्र्यानंतर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमतींना आरक्षण देण्यात आले.त्यानंतरही काही जाती-जमाती मागासलेल्या असल्याचे आणि आरक्षणापासून वंचित राहील्याचे निदर्शनास आले.अश्या जाती जमातींना सामावून घेण्यासाठी १९४९ साली अंट्रोलीकर आयोग आणि १९६१ साली थाडे आयोग स्थापन झाले.शाशनाने त्यांच्या सूचनांचा स्वीकार करून २१/नोव्हेंबर/१९६१ परिपत्रक काढून डीनोटीफाईड ट्राइब्स,विमुक्त-भटक्या जातींना आरक्षणाचे दरवाजे खुले करण्यात आले.पण सदर जाती जमाती मूळ प्रवाहापासून अनेक वर्ष दूर ठेवण्यात आल्याने तसेच अडाणी अशिक्षित असल्याने याचा नेमका कसा लाभ घ्यावा या विषयी कमालीचे अद्न्यान समजत होते.आणि म्हणून शिक्षण नाही,नोकरी नाही,पदोन्नती नाही,सगळीकडे बॅकलॉग शिल्लक राहिला व तो वाढत् गेला.

चाणाक्ष लोकांच्या हे लक्षात आल्याबरोबर नमासाधर्म्याचा आणि जाती सापेक्षतेचा लाभ उठवण्यासाठी लाखोंच्या संख्येत खोटी जात प्रमाणपत्रे मिळवली गेली.अश्या प्रकारे सवलतीचे वाटेकरी व त्यांच्या पिढ्या तयार होत गेल्या आणि मूळ भटक्या-विमुक्त व डीनोटीफाईड ट्राइब्स वर अन्याय झाला.
१९६१ नंतर १० ते १२ वर्षाच्या काळात मूळ भटक्या-विमुक्त जाती पैकी काही मंडळी सुशिक्षित झाली आणि नोकरीवर लागली.पदोन्नतीच्या वेळी त्यांचे लक्षात आले की आपल्यासाठी राखीव असलेल्या जागेवर् खोट्या आणि घुसखोर लोकांची वर्णी लागत आहे.असंघटित आणि अल्प द्न्यानी असल्याने अशावेळी काय करावे हे त्यांना कळेनासे झाले."ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असो द्यावे समाधान"या उक्तीप्रमाणे समाधानी पावले.जेव्हा मिळायचे तेव्हा मिळेल प्रमोशन.तेव्हाच घेऊ.आणि प्रमोशन घेऊन तरी काय करायचे? उगाच दुसरीकडे बदली होईल.परगावी जावे लागेल.म्हणून प्रमोशन नाकारण्याची प्रवृत्ती बळावली.येथेच घुसखोरांचे फावले.
*"समान संधीसाठी विशेष संधी "देण्याचे धोरण अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती आणि मागासवर्गीय यांच्यासाठी शाशनाने स्वीकारले आहे.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सूचनेनुसार १९५६ साली या धोरणाचा अवलंब केला गेला..मागासवर्गीय जातीजमातींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी घटनात्मक संरक्षण देण्यात आले.
*आज खरया अर्थाने समान समान पातळीवर भटक्या विमुक्त डीनोटीफाईड ट्राइब्स जाती जमातींना आणण्याची गरज आहे.आणि म्हणून "समान संधीसाठी विशेष संधी" देण्याची आवश्यकता आहे.विमुक्त-भटक्यांचा उन्नती,उत्कर्ष,आणि विकास घडवून आणण्यासाठी या धोरणाचा प्रभावी वापर व्हायला हवा."खास सवलती" देऊन आजही उपेक्षितांचे जीवन जगणारयांना "समाजाच्या मुख्य प्रवाहात" सामील करून घेण्यासाठी "विशेष संधी" देण्याचा आमचा आग्रह आहे.
*आजही अनेक जातीजमाती व्यवसायासाठी महाराष्ट्रभर,देशभर,रानोमाळ भटकतांना दिसतात.त्यांच्या वस्त्यावर,तांड्या मध्ये किमान नागरी सुविधाही मिळत नाही.शिक्षणाचा अभाव आहे.शाशणाच्या सवलती त्यांच्या पर्यंत पोहोचतच नाही.मधल्यामध्येच घुसखोर आणि खोटी जात प्रमाणपत्रे घेणारे या सवलती लाटताट.भटक्या-विमुक्तांचे सक्तीने पुनर्वसन करणे व त्यांना सक्तीचे शिक्षण देणे आवश्यक आहे.किमान नागरी सुविधा मिळाव्यात,सरकारी विविध योजनांचा लाभ घेता यावा,अशी निर्माण व्हावी."घटनात्मक संरक्षण" व केंद्र सरकार च्या सवलती चा "राजकीय,शैक्षणिक,नोकरी आणि सामाजिक वाटा देण्यासाठी चे प्रयत्न व्हायला हवेत.