डॉक्टर अनिल साळुंके,साई क्लिनिक,हलावपूळ,कुर्ला,मुंबई.४०००७०.

नशा मुक्ती अभियान 

दिनांक १३/३/१३ बुधवार रोजी नशा मुक्ती अभियानंतर्गत कुर्ला (प) येथे एका जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.मुंबई,महाराष्ट्रातील आणि देशातील व्यसनाधीन झालेल्या लोकांना व्यसनातून बाहेर काढण्यासाठी मार्गदर्शन या सभेत करण्यात आले.




व्यसनातून मुक्त करण्यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत.त्या आपापल्या परीने काम करत असतानाही व्यसनाच्या जाळ्यात अडकणारयाची संख्या कमी झालेली नाही.दिवसेंदिवस नवनवीन लोकांची त्यात भर पडत आहे.सध्या श्रीमती पामेला डेझी डेझी दत्ता मॅडम यांच्या पुढाकाराने,विभागातील प्रसिद्ध समाजसेवक सेवाभावी डॉक्टर अनिल साळुंके यांच्या सहकार्याने आणि पोलीस उपायुक्त श्री धनंजय कुलकर्णी यांच्या भक्कम पाठिंब्याने व्यसनमुक्ती अभियान राबविण्यात येत आहे.त्यासाठी कुर्ल्यात दिनांक १३/३/१३ दुसरी मोठी सभा घेण्यात आली.हजारो लोकांनी हा कार्यक्रम पहिला,ऐकला आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सद्ध्या नशा येण्यासाठी वेगवेगळ्या ड्रग्स चा वापर करण्यात येतो.चरस,कोकेन,अफू,गांजा,गर्द,तंबाखू,सिगरेट,भांग इत्यादी पदार्थांचा त्यात समावेश असतो.काही औषधांचा ही वापर होऊ लागला आहे."बटन" नावाची गोळी सद्ध्या प्रचलित झालेली आहे.ड्रग अडिक्ट लोकात बहुतेकांना ही गोळी माहित आहे.ती प्राप्त करून सामुदायिक पणे किंवा एकट्याने सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे.त्याचे परिणाम किती भयानक आहेत याची जाणीव मात्र त्यांना नाही.त्यातून मुक्त करण्याचा प्रयत्न म्हणून नशा मुक्ती अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे.
अभियान यशस्वी करण्यासाठी समाजातील सर्व लोकांचा सहभाग यासाठी आवश्यक आहे.समाजातील तरुण वर्ग "रेव्ह पार्टी" करण्यात मश्गुल झालेला आहे.धनिक पुत्रांच्या हातात मुबलक पैसा आलेला आहे.त्याचा सदुपयोग करण्या ऐवजी दुरुपयोग करण्यात धन्यता मानली जातेय.एखादा गरीब कुटुंबातला मुलगा किंवा व्यक्ती या व्यसनाला बळी पडला तर संपूर्ण कुटुंबच देशोधडिला लागण्याचा प्रकार घडत आहे.याच तळमळीतून पामेला दत्ता ही एक महिला नशा मुक्त समाज निर्माण करण्यासाठी कमाला लागली आहे.


एखादी व्यक्ती व्यसनाच्या विळख्यात अडकत जाते, हे काही झटपट होत नाही. तज्ज्ञांच्या मते ही एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेचे एकूण तीन टप्पे असतात. त्या त्या टप्प्यावर काही विशिष्ट लक्षणंही दिसतात. त्यांच्या आधाराने आपली अवस्था नेमकी कोणत्या टप्प्यातली आहे, हे ओळखता येतं. आणि पुढचा टप्पा गाठायला धावणार्‍या पायांना आवर घालण्याची संधीदेखील मिळते. आज समजून घेऊया हे तीन- महत्त्वाचे टप्पे

ब्लॅक आउट होतात
मागच्याच विकएण्डला खरंतर राहुलने त्याच्या मित्रांबरोबर ‘घेतलेली’ होती. एका मित्राला नोकरी लागल्याबद्दल त्यानं दिलेल्या पार्टीत राहुलनं यथेच्छ घशाखाली उतरवलेली होती, पण तरीही त्याला या विकएण्डला पुन्हा पिण्याचा मोह झालाच. हल्ली राहुलचं हे असं वरचेवर होतं. पिण्यासाठी तो कारणंच शोधत असतो. कुणी मित्र पार्टी देतोय का, किंवा कुणी त्याच्याबरोबर यायला तयार होतोय का, त्यातून फुकट मिळाली तर उत्तमच; तसं नाहीच जमलं तर राहुलची पैसे खर्च करण्याचीही तयारी असते आणि पूर्वी एखाद-दीड पेगमध्ये उठणारा राहुल आता चार-चार पेग झाले तरी त्याचं समाधान होत नाही. आपण दारूच्या आहारी जातोय हे त्याच्या लक्षातच येत नाही. राहुलसारखं अनेकांचं होतं. अनेकांना आपण दारूच्या विळख्यात शिरतोय हे समजतच नाही. हाच असतो व्यसनाचा प्राथमिक टप्पा.
प्राथमिक टप्पा
१. एखादी व्यक्ती व्यसनाधीन होते आहे हे सांगणारी पहिली खूण म्हणजे पहिल्यापेक्षा जास्त प्रमाणात त्याला दारू प्यावीशी वाटते. कालपर्यंत तो/ती जेवढी दारू पीत होती त्यापेक्षा जास्त दारूची इच्छा शरीर व्यक्त करायला लागतं.
२. याच अवस्थेत अनेकदा अनेक जण ब्लॅक आउटचा अनुभव घेतात. ब्लॅक आउट अवस्थेमध्ये दारूचं व्यसन असलेली व्यक्ती विविध कामं करत असते, उदा. ती नीट चालते, गाडी चालवते, जीभ जरा जड असली तरी बोलते, शुद्धीत असल्यासारखी वागते पण नंतर त्या व्यक्तीला त्यातली एकही गोष्ट आठवत नाही.
३. नेहमीचे काम करत असतानादेखील अशी व्यक्ती मनात कुठेतरी सतत दारू कशी आणि कुठे मिळवता येईल या विचारांमध्येच मग्न असते.

ताबा सुटतो..
यावेळी नाहीच प्यायची. अगदी मित्रांनी आग्रह केला तरी नाही. आणि समजा प्यायलीच तरी एका पेगच्या वर जायचंच नाही. - योगेशनं हे मनाशी अगदी पं ठरवलेलं होतं. मनाशी खूणगाठ बांधूनच तो मित्रांबरोबर बाहेर पडला; पण इतरांच्या हातातले ग्लास बघून त्याला मोह आवरता आला नाही. आणि एकच पेग प्यायचा हा त्याच्यापुरता त्यानं केलेला नियमही त्यानं पहिल्याच दिवशी मोडला.
असे नियम योगेशनं यापूर्वीही अनेकदा केलेले होते. दारू सोडायला पाहिजे. निदान कमी करायला पाहिजे याची त्याला कल्पना होती, तशी त्याची इच्छाही होती पण दर वेळी दारू न पिण्याच्या निर्णयावरून तो घसरतो, त्याचा ताबा सुटतो आणि तो मागचा, पुढचा कसलाही विचार न करता पीत सुटतो. घरी आल्यावर किंवा त्याला या व्यसनातून बाहेर काढण्यासाठी धडपडणार्‍या मित्रमैत्रिणींनी जाब विचारला की तो कारणं द्यायला लागतो. कधी गर्लफ्रेण्डशी भांडण झालं म्हणून, कधी मित्रांनी आग्रह केला म्हणून तर कधी वडिलांशी प्रचंड टोकाचे वाद झाले म्हणून. दर वेळी कारणं वेगळी असतात पण योगेशचं दारू पिणं काही कमी होत नाही.
हाच असतो व्यसनाचा अत्यंत धोकादायक आणि निसरडा मधला टप्पा.
मधला टप्पा
१. यात किती दारू प्यायची यावर असणारा व्यक्तीचा ताबा जातो. व्यक्ती इच्छा असूनही व्यसनाचे प्रमाण कमी करू शकत नाही. याही टप्प्यात दोन महत्त्वाच्या गोष्टी घडतात.
२. वेळ, काळ, स्थळ, आणि दारू पिण्यामागच्या कारणांवरचाही ताबा जातो. असा ताबा जाणे ही व्यसनाच्या विळख्यात ती व्यक्ती अडकली आहे हे समजण्याचा थेट संकेत मानला पाहिजे.
३. व्यक्ती सतत सबबी सांगायला लागते. आपण जास्त दारू प्यायला लागलो आहोत याची तिला कल्पना असते; पण त्यावर मात करता येत नसल्यामुळे तो/ती प्रेमभंग, मित्र-मैत्रिणींचे आग्रह, घरातलं तणावदायक वातावरण, ऑफिसातले ताणतणाव अशी अनेक कारणं द्यायला लागते. त्याचप्रमाणे आपल्या क्षमतेपेक्षा आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्याच्या मागे लागते. बढाया मारणे, खिशात पैसे नसताना खर्च करणे, तो खर्च करता यावा यासाठी वाटेल तिथून पैसे गोळा करणे, उधार्‍या करणे, घरी चोरी करणे असले प्रकार ही व्यक्ती करायला लागते.

सारं हातातून निसटतं.
कालपर्यंत कुणाची तरी संगत शोधून दारू प्यायला जाणारा विकास आता एकटाच निरनिराळ्या हॉटेलांमधून त्याच्या मित्रांना दिसायला लागला होता. इतकंच नाही तर संध्याकाळी सात वाजता, दुपारी एक वाजता, एकदा तर एका मित्रानं त्याला एका हॉटेलात सकाळी दहा वाजताही दारू पिताना बघितलं होतं. त्याला दिवस आणि रात्र दारू लागत होती. कधीही कुणालाही भेटला तरी त्याच्या तोंडाला दारूचा वास येत असायचा. याच दारूपायी तो परीक्षेत नापास झाला. गर्लफ्रेण्ड सोडून गेली. मित्र दुरावले. दारूसाठी सोकावलेले मुंगळे त्याच्या आजूबाजूला फिरत असायचे.
अनेकांनी विकासला सांगून बघितलं; पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. आईबाबांनी मुलगा वाया गेला असं म्हणत त्या विषयावर बोलणं सोडून दिलं. दारूपायी झालेल्या विकासच्या बाहेरच्या उधार्‍या आणि घरातल्या चोर्‍या यांनी त्याचे आईबाबा पार वैतागून गेले होते. पण सांगणार कुणाला? दारूखेरीज दुसरा कुठलाही विचार करण्याची क्षमता विकासमध्ये उरलेली नव्हती.
हाच असतो अतिशय गंभीर आणि संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून टाकणारा शेवटचा टप्पा. या टप्प्यापासून परत येण्याचा चान्स प्रत्येकाला मिळतो पण जर त्याचं गांभीर्य लक्षात आलं नाही तर मात्र सगळंच हातातून निसटून जातं.
गंभीर अवस्था
१. या अवस्थेमध्ये शारीरिक, मानसिक व सामाजिक स्तरावर जाणवण्याइतपत हानी व्हायला सुरुवात होते. व्यक्तीचे कौटुंबिक संबंध विस्कळीत होऊन, दारूशिवाय दुसरा कसलाच विचार करण्याची तिची क्षमता संपून जाते.
२. व्यक्ती सातत्यानं कितीतरी दिवस केवळ दारू पीत राहते. तहान, भूक विसरून फक्त दारू पिणंच चालू होतं. शुद्धीत आल्यावर पुन्हा दारू पिण्याची तीव्र इच्छा होते आणि ती मिळवण्यासाठी व्यक्तीचा धडपडाट सुरू होतो.
३. व्यक्ती खोटं बोलायला लागते. चोरी किंवा उधारी सुरू होते. जेणेकरून दारूचा साठा किंवा सतत दारू मिळण्याची सोय शाबूत राहील. जेव्हा व्यक्ती या अवस्थेला पोहचते तेव्हा दोन गोष्टी होऊ शकतात. एकतर ती पूर्णपणे दारूच्या आहारी जाते किंवा व्यसनाच्या विळख्यातून बाहेर पडण्याची मानसिक तयारी करून त्यातून प्रयत्नपूर्वक बाहेर पडते.




- व्यसनांच्या विळख्यात बरबाद तारुण्याच्या काळ्या दुनियेची अस्वस्थ सफर

मित्रांच्या घोळक्यात बसून सिगरेटचे झुरके मारणं आणि कधीमधी दारूचे प्याले रिते करणं हे विकास आणि त्याच्या मित्रांचे नेहमीचेच उद्योग होते. हॉस्टेलवर कुणाच्या तरी रूमवर चोरून बाटल्या आणायच्या आणि रात्री जागवायच्या. तसं बघायला गेलं तर या हॉस्टेलच्या दारूपाटर्य़ांची सुरुवात वर्षभरापासून झाली तेव्हा कुणाच्याच खिशात फारसे पैसे नसायचे. त्यामुळे ‘सिक्रेट फंड’ म्हणून मग जो तो महिन्याला घरून येणार्‍या पैशातून काही पैसे बाजूला काढून ठेवायचा. महिन्यातून एकदोनचा तरी पार्टी करता यावी यासाठी.
विकासनं ‘पहिली’ चव घेतली ती अशाच हॉस्टेलमधल्या पार्टीतून. सुरुवातीला एक पेग. मग दोन. मग चार. मग सहा. विकासची कपॅसिटी दिवसेंदिवस वाढतच गेली. कपॅसिटी वाढणं ही धोकादायक बाब न वाटता त्याच्यासकट त्याच्या सगळ्या मित्रांना त्यात विलक्षण थ्रील आणि कौतुक वाटत असे. पण हाच बेपर्वा अँटिट्यूड विकासला खूप महागात पडला. त्याचं शरीर दारूला इतकं सोकावलं की, चार पेगच्या खाली ते विकासलाही जुमेनासं झालं.
या लेखमालेचं काम करत असताना, नियमितपणे दारू पिणार्‍या अनेक तरुण-तरुणींशी मी बोलते आहे. त्यांचा प्रवास समजून घेते आहे.
बहुतेकांची सुरुवात ‘एक पेगही झेपत नाही’ इथपासून ते ‘चार-सहा सहज जातात’ इथपर्यंत झालेली आहे आणि यात तरुण-तरुणी असा भेदभाव नाही. सुरुवातीला बिअर नाहीतर जीन घेणार्‍या आणि नंतर मित्रांबरोबर बैठक मारून रीतसर रम किंवा व्हिस्कीचे दोन-चार पेग मारणार्‍या तरुणीही मला भेटल्या.
या सगळ्यांच्या बोलण्यात ‘कपॅसिटी वाढणे’ हा मुद्दा पुन:पुन्हा येत होता. दारू पिण्याची क्षमता वाढते म्हणजे नेमकं आपल्या शरीरात काय होतं हे समजून घेणं फार जरुरीचं आहे.
---------***---------

‘कपॅसिटी’ म्हणजे काय?
१. पिण्याची जेव्हा सुरुवात होते तेव्हा नव्यानं पिणार्‍याला एकाच पेगमध्ये नशा होते. त्याच्या मनावरची, शरीरावरचीही बंधनं सैलावतात. मस्त वाटतं. कशाचा ताण नाही. कशाशी घेणंदेणं नाही. कोण काय म्हणेल, आपल्याविषयी कोण काय विचार करतं, या कशाचीही फिकीर नाही.

२. सातत्यानं काही वेळा एक पेग घेतल्यानंतर कालांतराने हे बंधनमुक्त मस्त वाटणं एका पेगमध्ये होईनासं होतं. एका पेगमध्ये नशा होत नाही. झिंग येत नाही. मग एकाचे दोन होतात आणि दोनाचे चार.

३. त्यातून खिशात चणचण असेल तर इंग्लिश, भारीतली परवडत नाही. मग ती झिंग मिळवण्यासाठी व्यक्ती देशी किंवा हातभट्टीकडे वळते. म्हणजेच त्या व्यक्तीच्या शरीराची दारू पचवण्याची क्षमता वाढते. शरीराची गजर वाढते. मनाला बरं वाटण्याचं फिलिंग मिळवण्याची इच्छा तीव्र व्हायला लागते. आणि मग आपण काय दर्जाचं मद्य पितोय याला महत्त्व राहत नाही. गरज उरते ती फक्त ते मस्त वाटणं मिळवण्याची.

४. एक प्रकारे शरीर मद्यावर अवलंबून रहायला लागतं. शरीर आणि मन मद्याचं गुलाम बनतं. ही गुलामगिरी इतकी वाढत जाते की, सुरुवातीला झिंग मिळवण्यासाठी, आनंद मिळवण्यासाठी मद्य पिणारी व्यक्ती नंतर नॉर्मल राहण्यासाठी मद्य प्यायला लागते. कारण शरीराचं आणि मनाचं विसंबणं इतकं वाढलेलं असतं की, दारू मिळाली नाही तर हातपाय थरथरणं, उलटी होणं, मळमळणं, डोकं धरणं असले प्रकार व्हायला लागतात.

५. शरीरानं कसलाही त्रास न देता सुरळीत चालू राहण्यासाठी मद्य पिण्याशिवाय गत्यंतर उरत नाही. माणूस व्यसनी बनतो. मद्याचा गुलाम !
----------***----------

खरं. आणि खोटं
१.व्यसनी लोक वाईट प्रवृत्तीचे, वेडसर आणि बावळट असतात.
- आतापर्यंत केलेलं संशोधन असं सांगतं की, व्यसनी लोक मुळात वाईट प्रवृत्तीचे नसतात किंवा वेडे नसतात. बावळटही नसतात. व्यसन हा मेंदूशी संबधित आजार आहे. तो बळावला की तो व्यसनाच्या पलीकडे जातो.
२.व्यसन करणार्‍यांना शिक्षा द्यावी, उपचार नाहीत.
- शास्त्र सांगतं की, व्यसनी लोकांना मेंदूचा आजार असतो. ज्यामुळे त्यांचा मादक पदार्थ घेण्यावर ताबा राहत नाही. अशा वेळी लोकांच्या मज्जारज्जू-रसायनांवर उपचार करण्याची आवश्यकता असते.
४.एका व्यसनात अडकलेले लोक सगळीच व्यसनं करतात.
- असं कधी कधी घडतं. पण दरवेळी घडेलच असं नाही.
५.व्यसनी लोक औषधोपचाराने बरे होऊ शकत नाहीत.
- औषधोपचार रुग्णाला पुन्हा व्यसनाकडे जाण्यापासून परावृत्त करतात किंवा त्या व्यसनाबद्दलची निरिच्छा निर्माण करतात. संवादप्रक्रिया यशस्वी करण्यासाठी अशी औषधं उपयोगी पडतात.
६.व्यसन ही वर्तणुकीशी संबंधित समस्या नाही.
- हाही एक गैरसमज आहे. मेंदूच्या स्कॅनिंगच्या अभ्यासातून हे स्पष्ट झालं आहे की वर्तणुकीशी संबधित उपचारपद्धती वापरून हा आजार बरा केला जाऊ शकतो.
७.अल्कोहोलिक अँनॉनिमससारख्या संस्थांमध्ये गेल्याने व्यसन सुटत नाही.
- हा एक मोठाच गैरसमज आहे. सारखीच समस्या असणारे लोक एकत्रित झाले तर त्या समस्येतून बाहेर पडायला त्यांना नक्कीच मदत मिळू शकते. पण निव्वळ ए.ए. वर अवलंबून राहून व्यसन सुटतंच असं नाही. प्रत्येक व्यक्तीचं व्यसन काय स्वरूपाचं आहे यावरही बर्‍याच गोष्टी अवलंबून असतात.
----------***----------

दिमागकी बत्ती.
मनुष्याचा मेंदू हे विलक्षण गुंतागुंतीचं आणि अतिशय बारकाईनं विणलेल्या संप्रेरकाचं जाळं आहे. ज्यामध्ये वेगवेगळी कार्ये करणार्‍या लाखो पेशी असतात. या पेशीच आपले विचार, भावना, दृष्टिकोन प्रेरित करत असतात. सतत मादक पदार्थाचा वापर केल्यामुळे मेंदूतील विविध प्रक्रियांचा समतोल बिघडतो. त्याचा विपरीत परिणाम तसाच काही काळ राहतो आणि शेवटी त्या व्यक्तींच्या इतर सामान्य गरजा बाजूला पडून केवळ त्या पदार्थाशी निगडित विषयांकडे, ते मिळवणं आणि त्याचं व्यसन करणं याकडे लक्ष केंद्रित होतं.
म्हणजेच माणसाला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त ‘पिण्या’च्या विचारानंच घेरलेलं असतं. डोक्यात सतत तेच विचार असतात, शरीरही त्याचीच मागणी करत असतं. त्यामुळे उठल्यापासून नशा करायला मग सुरुवात होते.
अशावेळी मेंदूत नेमकं घडतं काय?
मादक पदार्थांचं सेवन केल्यानंतर मेंदूच्या पेशींच्या जाळ्यांमध्ये संदेश क्रियाशील होतात. त्या मादक पदार्थांमुळे, मेंदूतील डोपामाईन नावाच्या रसायनाची पातळी वाढते. ज्यामुळे आनंददायी संवेदना निर्माण होतात. या संवेदना मेंदूच्या आठवणीत राहतात आणि परत परत त्या अनुभवण्याची इच्छा होते. ही इच्छा कालांतराने तीव्र इच्छेत बदलते. ज्याप्रमाणे अन्न हे जगण्यासाठी गरजेचं आहे, याचप्रमाणे मादक पदार्थांंचं सेवन व्यसनी व्यक्तीसाठी महत्त्वाचं ठरतं. तो पदार्थ मिळवणं आणि घेणं ह्याची गरज इतर सगळ्या अस्तित्वासाठी महत्त्वाच्या गरजांपेक्षा वाढत जाते. तहान-भूक हरपून, नातेसंबंध, करिअर, शिक्षण या सगळ्या गोष्टी दुय्यम ठरून निव्वळ नशा करण्याला महत्त्व प्राप्त होतं.


मास्को। रूस ने अपने नागरिकों की सेहत का ध्यान रखते हुए ऐसे कई कोल्ड ड्रिंक्स पर प्रतिबंध लगा दिया है, जिसमें अधिक एल्कोहल मिला हुआ हो। वहीं, यूरोपीय संघ ने जानवरों के खिलाफ हो रहे अत्याचार को रोकने के लिए उन पर कास्मेटिक टेस्ट पर प्रतिबंध लगा दिया है।
रूस ने एल्कोहल की अधिकता वाले ठंडे पेय पदार्थो पर प्रतिबंध लगाने के संबंध में संसद के निचले सदन में एक बिल पारित किया गया है।
सूत्रों के मुताबिक, जिन ठंडे पेय पदार्थो में एल्कोहल की मात्रा 1.2 प्रूफ से अधिक पाई जाएगी, रूस में उनकी ब्रिकी प्रतिबंधित होगी। ऐसे पेय पदार्थो के सेवन से खून और दिल से संबंधी बीमारियां होने का खतरा है। ऐसे पेय किशोर-किशोरियों और गर्भवती महिलाओं के लिए भी नुकसानदेय शाबित हो सकते हैं। युवा वर्ग ठंडे पेय पदार्थ अधिक पसंद करते हैं।
वहीं, यूरोपीय संघ ने जानवरों पर कास्मेटिक टेस्ट पर प्रतिबंध लगा दिया है। जानवरों के खिलाफ हो रहे अत्याचार को रोकने के लिए यूरोपीय संघ ने यह कदम उठाया है। फ्रांस में दो हजार जानवरों पर कास्मेटिक टेस्ट किए जा चुके हैं।



लॉस एंजिल्स। शोधकर्ताओं ने एक ऐसा कैप्सूल तैयार किया है, जो चुटकियों में नशा उतार देगा। शोधकर्ता एक छोटे से कैप्सूल में दो पूरक एंजाइम भरने में सफल रहे, जो तेजी से शरीर से एल्कोहल निकालने में मदद करते हैं।
कैलिफोर्निया यूनिवर्सिटी के युंगफेंग लू की अगुआई में इस शोध को अंजाम दिया गया। शोधकर्ताओं के मुताबिक दोनों एंजाइम पाचन तंत्र में एल्कोहल को लिवर की तरह ही प्रोसेस करते हैं। आगे जाकर यह खोज हैंगओवर से बचने का अहम उपाय हो सकती है। कोशिकाओं में पाए जाने वाले प्राकृतिक एंजाइम एल्कोहल को शरीर से बाहर करने के लिए मिलकर काम करते हैं। शोधकर्ताओं ने कृत्रिम रूप से कई एंजाइम साथ जुटाए, ताकि वे प्राकृतिक तरीके की नकल कर सकें। एल्कोहल ऑक्सीडेज नामक एंजाइम एल्कोहल के ऑक्सीकरण को बढ़ावा देता है, पर जहरीली हाइड्रोजन पेरॉक्साइड भी पैदा करता है। हालांकि दूसरा एंजाइम हाइड्रोजन पराक्साइड को पानी और ऑक्सीजन में विघटित कर उसके जहरीले असर को खत्म कर देता है। दोनों एंजाइम को साथ रखने पर सफलतापूर्वक एल्कोहल को निकाला जा सकता है। शोधकर्ताओं ने दोनों एंजाइम को जिस पॉलीमर कैप्सूल में रखा, उसका व्यास कुछ नैनोमीटर ही है।